'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:19 PM2021-11-12T20:19:57+5:302021-11-12T20:22:29+5:30

Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) registered complaint : मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला  तक्रार दाखल केली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

Sexual Abuse for being a 'sex worker'; Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) sensational allegation | 'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

Next

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार गुंड रियाझ भाटीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीवर सेक्स वर्कर बनवून तिचा छळ केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे. इतकंच नाही तर रियाझ भाटीच्या पत्नीने पतीवर हायप्रोफाईल लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे एका क्रिकेटरचे देखील नाव या प्रकरणात उघड झाले आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला  तक्रार दाखल केली आहे.  अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी रियाझ भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. भाटीसोबतच क्रिकेटरसह राजकीय लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने मुंबईपोलिसांसमोर दाखल केलेल्या अर्जात ज्या लोकांवर बलात्काराचा आरोप केला आहे.  त्यात नामांकित क्रिकेटपटूसह राजकीय मंडळींचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप याप्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. एएनआयशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल, अद्याप तपासात गुन्ह्याची माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Sexual Abuse for being a 'sex worker'; Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.