Sensational! Thieves robbed the BJP leader's house | खळबळजनक! भाजप नेत्याचे घर चोरट्यांनी फोडले
खळबळजनक! भाजप नेत्याचे घर चोरट्यांनी फोडले

ठळक मुद्दे३ लाख ९२ हजारांची रक्कम केली लंपास घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू - जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानाच्या खिडकीच्या ग्रिल काढून अज्ञात चोरटय़ांनी घरात प्रवेश करून कपाटातील ३ लाख ९२ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे पाथरी रस्त्यावर  निवासस्थान आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चार चोरटय़ांनी घराच्या समोरील खिडकीचे लोखंडी ग्रिल अलगद काढले. स्लायटिंग चे काच बाजूला सारून चोरटे घरात शिरले. त्यातील एक चोरटय़ाने  हाॅल मध्ये झोपलेल्या खाजगी सेवक ज्ञानेश्वर शिंदे यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईल स्वत कडे घेतला त्याच्या  खिशातून १५ हजार ५००  रूपये हिसकावून घेतले. तीन चोरटय़ांनी बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ७७ हजार रुपये रोख लांबविले. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे बाहेर गावाहून पहाटे ३.२५  वाजता निवासस्थानी परतले. घराचा दरवाजा सेवक उघडत नसल्याने आणि सेवक फोन उचलत नाही हे पाहता चालकाने गाडीचा हाॅर्न दिला  आवाज ऐकताच  घरातील  चोरटे रोख रक्कम घेऊन पसार झाले. याप्रकरणी बोर्डीकर यांचे खाजगी सेवक ज्ञानेश्वर उत्तमराव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरूद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sensational! Thieves robbed the BJP leader's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.