Sensational! In Curfew also shot dead by Congress leaders during the day in jabalpur pda | खळबळजनक! कर्फ्यूतही दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या 

खळबळजनक! कर्फ्यूतही दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या 

ठळक मुद्देधर्मेंद्र सोनकर असे काँग्रेस नेत्याचे नाव आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यू असूनही हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्याचा आरोपी मोनू सोनकर हा असून त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये गुरुवारी घराबाहेर एका काँग्रेस नेता आणि माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

हत्येच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

 

मात्र, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. हत्येचे कारण परस्पर शत्रुत्व असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी कर्फ्यूदरम्यान पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असतानाही काँग्रेस नेत्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे परिसरात दहशत पसरली होती. जुन्या शत्रूत्वामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी प्रभाग नगरसेवक यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हनुमानतालस्थित भानतलैया भागात दुपारी गोळीबार झाल्याने घबराट पसरली. या भागातील राधाकृष्ण मालवीय प्रभागातील माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनकर हे घराच्या बाहेर मंदिरात बसले होते. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. गुन्हा करून हल्लेखोर पळून गेले. जवळच्या लोकांनी धर्मेंद्र सोनकर यांना गंभीर अवस्थेत शहर रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

धर्मेंद्रच्या छाती आणि पोटात गोळ्या लागल्या
हल्ल्यादरम्यान धर्मेंद्र सोनकर यांच्या छातीवर आणि कमरेला गोळी लागली होती. गोळी लागताच सोनकर जमिनीवर कोसळले. गोळीचा आवाज ऐकताच कुटुंबीय घराबाहेर घटनास्थळी पोचले, तेव्हा धर्मेंद्र रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेले होते. 

नातेवाईक आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने त्याला तातडीने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे की, हल्ल्याचा आरोपी मोनू सोनकर हा असून त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांना ठार मारल्यानंतर आरोपीने स्व:त पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि सांगितले की धर्मेंद्र यांची हत्या करून तो आला आहे.

 

Web Title: Sensational! In Curfew also shot dead by Congress leaders during the day in jabalpur pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.