खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:31 IST2020-03-02T16:28:41+5:302020-03-02T16:31:36+5:30

या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. 

Sensational! The accused had called on the pretext of organising a party, gang raped and killed a minor girl pda | खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

ठळक मुद्देपीडित मुलीला घरी पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला शनिवारी पीडित मुलीचा मृतदेह सापडला.हपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकला गावात शुक्रवारी १२ वर्षीय मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला

तेजपूर: आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या सात विद्यार्थ्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलांनी मुलीला झाडाला लटकवून गळफास लावला आणि हत्या केली. ही घटना शुक्रवारी चाकला गावात घडली आहे. गोहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकला गावात शुक्रवारी १२ वर्षीय मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात नेऊन झाडावर लटकावून गळफास लावला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. रविवारी पोलिसांच्या पथकाने या सर्व सात दहावीच्या परीक्षार्थींना पकडले.


परीक्षेनंतर आरोपीने पीडित मुलीला घरी पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. शुक्रवारी रात्री मुलीवर बलात्कार केल्याचा संशय आहे आणि त्यानंतर घराजवळ जंगलातील झाडावर तिला लटकविण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. शनिवारी पीडित मुलीचा मृतदेह सापडला.

Web Title: Sensational! The accused had called on the pretext of organising a party, gang raped and killed a minor girl pda