एकच खळबळ! रेल्वेच्या बंद पडलेल्या कर्मचारी कॉर्टरमध्ये बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 16:29 IST2021-09-12T16:28:32+5:302021-09-12T16:29:24+5:30
Rape on Minor : उल्हासनगर रेल्वे स्टेशन स्कायवॉक बनला गुन्हेगारांचा अड्डा

एकच खळबळ! रेल्वेच्या बंद पडलेल्या कर्मचारी कॉर्टरमध्ये बलात्कार
सदानंद नाईक
उल्हासनगर : गुन्हेगारांचा अड्डा झालेल्या उल्हासनगररेल्वे स्टेशन परिसर व स्कायवॉक शेजारील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बंद निवासस्थानात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्रीचे १० वाजल्या नंतर नशेखोर व गर्दुल्ले, भुरटे चोरांच्या दहशतीमुळे नागरिक स्कायवॉकवरून जाण्याची हिंमत करू शकत नाही. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यानेच बलात्कारा सारखी घटना घडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
उल्हासनगरवासियांना रेल्वे स्टेशन परिसरात येण्या-जाण्याचे सोयीचे व्हावे म्हणून स्टेशनच्या दोन्ही बाजूला कोट्यवधीच्या निधीतून एमएमआरडीएने स्कायवॉक बनविला. मात्र काही वर्षातच स्कायवॉकचा दुरुपयोग उघड झाला. स्टेशन परिसरातील संजय गांधीनगर, समतानगर, इमालीपाडा, लेफर्स कॉलनी आदी परिसरातील नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर आदींनी स्कायवॉकवर आपला धाक बसवून रात्री १० नंतर नागरिक स्कायवॉक वरून जाऊ शकत नाही. अशी दहशत निर्माण झाली. स्कायवॉकवर काही नशेखोरांनी एका इसमाचा दारू पिण्याचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून काही वर्षांपूर्वी घटना घडली होती. तर एका वाहतूक पोलिसावरही जीवघेणा हल्ला झाला होता. चोरी, लूटमार, कॉलेज मुलींना छेडणे, कॉलेजच्या तरुणाना धाक दाखवून लुटणे आदी अनेक प्रकार येथे घडले आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन समोरील रिक्षांची व गाडीची तोडफोड, पश्चिम बाजूच्या दुकानदारांची तोडफोड व मारहाण, स्टेशन परिसरात दहशत निर्माण करणे. आदी प्रकार नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर करीत असून याप्रकरणी मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र गांजा, गावठी दारूची सर्रासपणे विक्री आजही सर्रासपणे होत आहे. स्थानिक पोलिसांनी अनेकदा कारवाई करून गावठी दारू विक्री, गांजा विक्रीचे अड्डे पू र्णतः नष्ट का होत नाही. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या होत्या. पूर्वेतील चौकी स्टेशनच्या नुतनीकरणनंतर जागा नसल्याचे कारण देऊन बंद करण्यात आली. तर पश्चिमेतील सिएचएम कॉलेज समोरील पोलीस चौकी नावालाच सुरू असून दोन्ही चौक्या सुरू करण्याची मागणी जोर आहे.
बंद कॉटर्स ठिकाणी लायटिंग
रेल्वेच्या बंद पडलेल्या जुन्या कॉटर्स मध्ये शुक्रवारी रात्री १४ वर्षाच्या मुलीला धाक दाखवून अत्याचार केल्याचे शनिवारी दुपारी उघड झाले. या घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने बंद पडलेल्या कर्मचारी निवासस्थानांची झाडाझडती घेऊनखोल्यातील रेल्वे ठेकेदात्यांच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तसेच बंद कॉटर्स मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या खोलीची तपासणी केल्याची माहिती रेल्वे पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार यांनी दिली.