"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:28 IST2026-04-06T14:26:44+5:302026-04-06T14:28:02+5:30

Bihar Crime: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका BPSC शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

samastipur bpsc teacher wife girlfriend love story | "तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या

फोटो - आजतक

BPSC Teacher Death: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका BPSC शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुण कुमार असं शिक्षकाचं नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी एका शिक्षिकेवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. "पत्नीला घटस्फोट दे, तू फक्त माझाच आहेस" असा हट्ट प्रेयसीने धरल्यामुळे हतबल होऊन शिक्षकाने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण कुमार यांचं २०१७ मध्ये वैशाली येथील रहिवासी राइमा प्रसाद यांच्याशी लग्न झालं होतं. २०२३ मध्ये दोघांनीही 'BPSC TRE-1' परीक्षा उत्तीर्ण केली आणि शिक्षक म्हणून रुजू झाले. तरुण यांची नियुक्ती मुझफ्फरपूरमध्ये झाली, तर त्यांची पत्नी समस्तीपूरमधील केशोपट्टी गावात कार्यरत होती.

प्रेमसंबंध आणि वादाची ठिणगी

पत्नीच्या शाळेजवळ वास्तव्यास असताना तरुण यांची ओळख त्याच शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेशी झाली. ती शिक्षिका मूळची नालंदा येथील आहे. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शिक्षिका तरुण यांच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होती.

पत्नीला घटस्फोट द्यावा, या हट्टावर ठाम

या संबंधांमुळे तरुण यांच्या घरात वाद वाढू लागले. वडील अभिनव कुमार यांनी सांगितलं की, त्यांनी अनेकदा मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती सुधारली नाही. अगदी पत्नी राइमा प्रसाद यांनीही तडजोड करून सोबत राहण्याची तयारी दर्शवली होती, परंतु संबंधित शिक्षिका तरुण यांनी पत्नीला घटस्फोट द्यावा, या हट्टावर ठाम होती. या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे, ज्यामध्ये लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याचं स्पष्ट होत आहे.

पोलीस तपास सुरू 

सततचा मानसिक तणाव आणि दबावामुळे अखेर तरुण कुमार यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच मुसरीघरारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांना दिला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title : पत्नी को तलाक देने के दबाव में शिक्षक ने की आत्महत्या

Web Summary : बिहार में एक शिक्षक ने प्रेमिका द्वारा पत्नी को तलाक देने के दबाव में आत्महत्या कर ली। परिवार ने प्रेमिका पर आरोप लगाया है। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Teacher commits suicide after girlfriend pressures him to divorce wife.

Web Summary : Bihar teacher, harassed by his girlfriend demanding divorce from his wife, tragically commits suicide. Family blames the girlfriend's relentless pressure for the devastating decision. Police are investigating.