खळबळजनक! कमल हसनच्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:12 IST2018-11-13T18:12:17+5:302018-11-13T18:12:57+5:30
चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते.

खळबळजनक! कमल हसनच्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल
मुंबई - अभिनेत्री अक्षरा कमल हसन (वय २८) हिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी, वर्सोवा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांसह सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते. त्यानंतर, मोबाइल पाण्यात पडल्यानंतर तो बंद झाला. हे फोटो फक्त प्रियकर तनुज विरवाणीला पाठविले होते. २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. जानेवारी २०१८ मध्ये चार बंगला परिसरात राहण्यास आले. याच दरम्यान १ आॅक्टोबर रोजी खासगी फोटो युट्यूब, तसेच फेसबुकवर शेअर झाल्याचे समजताच धक्का बसल्याचे तिने तक्रारीत म्हटले.
याबाबत काहीच माहिती समोर न आल्याने, अखेर अक्षराने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार, ११ तारखेला तिचा जबाब नोंदवून वर्सोवा पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांसह सायबर पोलीस अधिक तपास करत असून, तिच्या माजी प्रियकराचीही पोलीस चौकशी करणार आहेत.