सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:34 IST2026-01-12T17:33:36+5:302026-01-12T17:34:09+5:30
मध्यप्रदेशातील रीवा येथे पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक केली. हा चोर त्याच्या एका व्यसनामुळे सापडला आहे. 'गुटखा' खाण्यासाठी काही सेकंद चेहऱ्यावर मास्क उघडणे त्याच्या अंगलट आले आहे.

सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
चोरीच्या घटना सगळीकडे घडत असतात. आता सीसीटीव्हीमुळे आरोपी लगेच सापडतात. मध्यप्रदेशात काही दिवसांपूर्वी एका सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला होता, या दुकानामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले होते. पण,आरोपींनी चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे चोरांची ओळख पटत नव्हती. मात्र, शेवटच्या क्षणी आरोपींच्या एका चुकीमुळे त्या चोरांची ओळख पटली आहे. ओळख पटण्याचे कारण त्या चोराचे व्यसन ठरले आहे.
गुटखा खाण्याच्या व्यसनामुळे सराफा दुकानातून चोरी करणाऱ्या मुखवटाधारी गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले. शहर कोतवाली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंचे दागिनेही जप्त केले आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपराटी येथील सराफा दुकानात ६ जानेवारी रोजी सायंकाळी चोरी झाली होती. सराफा व्यापारी विनोदकुमार खंडेलवाल हे घराचा दरवाजा बंद करून काही काळ वस्तीत सामान घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, चोरट्याने घरात घुसून दुकान गाठले आणि तेथे ठेवलेले चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. पळून जात असताना चोरट्याचे काही दागिने वाटेत पडले, त्यामुळे व्यापाऱ्याला चोरी झाल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच, सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात संशयितावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी एका कॅमेऱ्याने चेहऱ्यावर मास्क घातलेला संशयित गुटखा खाताना कैद झाला.काही सेकंद त्याने गुटखा खाण्यासाठी मास्क काढला तेव्हा त्याचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला.
सीसीटीव्हीमुळे चोर सापडले
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख राजेश सोनी अशी केली. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा साथीदार चिराग बद्धवानी उर्फ चिकू याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून सुमारे ३ लाख किमतीचे चोरीचे दागिने जप्त केले. पोलिस सध्या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.