खेदजनक... २ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 21:44 IST2018-07-25T21:42:38+5:302018-07-25T21:44:32+5:30
आरोपी मालकाला अटक

खेदजनक... २ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण
मुंबई - पश्चिम उपनगरातील लोखंडवाला परिसरातील एका प्रसिद्ध अशा प्लेग्रुप आणि नर्सरी चालविणाऱ्या शाळेत २ वर्षाच्या चिमुकलीचे शाळेच्या मालकानेच लैंगिक शोषण केल्याची खेदजनक घटना घडली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दिंडोशी न्यायालयात हजर केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२ वर्षाची चिमुकली या शाळेत प्लेग्रुपमध्ये शिकत होती. दरम्यान शाळेत या शाळेच्या मालकानेच २ वर्षाच्या लहानग्या मुलीचे लैंगिक शोषण केले. याबाबत या मुलीच्या घरी आई - वडिलांना माहिती मिळताच, त्यांनी मुलीला खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. नंतर या घटनेची शहानिशा केल्यानंतर मुलीच्या पालकांनी समता नगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला. नंतर पोलिसांनी शाळेच्या मालकाला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.