शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

सर्वोच्च न्यायालयाने हमी दिल्यास भारतात परतण्यास तयार - डॉ. झाकीर नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:51 IST

अटक न करण्याची हमी

ठळक मुद्दे राष्ट्रीय तपास यंत्रणनेकडून(एनआयए) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.जर अंमली पदार्थ किंवा दहशतवादासाठी काम करीत राहिलो असतो तर युएस आणि अन्य राष्ट्रांनी माझ्या चॅनेलला मान्यता दिली नसती.

मुंबई - आपल्यावरील आरोपांची चौकशी पुर्ण होईपर्यत अटक न करण्याची हमी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भारतात परतण्याची तयारी वादग्रस्त मुस्लिम धार्मिक विचारवंत डॉ. झाकीर नाईक याने दर्शविली आहे. भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास असलातरी भाजप सरकारकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्याने एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.डॉ. नाईक याने तीन वर्षापूर्वी भारतातून पलायन केले असून तो मलेशियात स्थायिक आहे. तेथील सरकारने त्याला कायमस्वरुपी रहिवाशाचा दर्जा दिला आहे. बेकायदेशीर पद्धतीने परदेशातून देणग्या गोळ्या केल्याप्रकरणी त्याच्यावर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) गुन्हे दाखल केले असून त्याची देशभरातील संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणनेकडून(एनआयए) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.त्याने म्हटले की, पूर्वीच्या शासन काळात तुम्ही जर सरकार विरोधात बोलत असाल तर तुम्हाला किमान ८० टक्के न्याय मिळण्याची हमी होती. आता भाजपा राजवटीत त्याचे प्रमाण १० ते २० टक्यावर आले आहे. यापुर्वीच्या घटना पाहिल्यास दहशतवादी घटनामध्ये अटक केलेल्या मुस्लिमापैकी ९० टक्के निरपराध तरुणांचा १० ते १५ वर्षे जाणीवपूर्वक छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले असून मी गेल्यास १० वर्षासाठी मला व माझ्या अभियानावर अडथळा आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनआयए मला मलेशियात प्रश्न विचारु शकते. जर सर्वोच्च न्यायालयाने अटक न करण्याची हमी दिल्यास मी भारतात हजर होवून माझे निर्दोषत्व सिद्ध करेन.बांग्लादेशात ढाका येथे १ जुलै २०१६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपींनी डॉ. झाकीर नाईक याच्या भाषणाने प्रभावित झाल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून तपास यंत्रणांनी त्याच्यावर फास आवळला असून मुंबईतील डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाउंडेशन(आयआरएफ) मुख्यालयासह देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून कार्यालये व मालमत्ता जप्त केली आहे. अवैध मार्गाने परदेशातून देणग्या मिळविणे, आणि देशविरोधी कृत्ये करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने त्याला आंतरराष्ट्रीय फरारी आरोपी घोषित करण्यााबाबतचा प्रस्ताव युनोने फेटाळून लावला आहे.त्याबाबत बोलताना नाईकने सांगितले की, मी कोणालाही दहशतवादाचा अवलंब करण्यास , निष्पापांना मारण्यास सांगितलेले नाही, की प्रेरणा दिलेली नाही. जर कोणी असे सांगत असल्यास तो खोटे बोलत आहे. मनी लॉँड्रिंगबाबतचे आपल्यावरील लावलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्याने केला. माझ्या बऱ्याच कंपन्या असून मी रिअल इस्टेट आणि अन्य व्यवसाय करीत आहे. जर अंमली पदार्थ किंवा दहशतवादासाठी काम करीत राहिलो असतो तर युएस आणि अन्य राष्ट्रांनी माझ्या चॅनेलला मान्यता दिली नसती.

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय