पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या आई आणि बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तीन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रमेश कोंडय्या दासरी (वय ३२, रा. दापोडी) याला अटक केली आहे.भोसरी पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. आॅक्टोबर २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली. आरोपीने फियार्दी तरुणीच्या आई व बहिणीला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला शिवीगाळ करून तिच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले.
लग्नाच्या आमिषाने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:53 IST