पुस्तक खरेदीसाठी बाजारात गेलेल्या विवाहितेसोबत बंदुकीच्या धाकावर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 21:09 IST2022-01-30T21:08:06+5:302022-01-30T21:09:15+5:30

Rape News : पीडितेने पोलिसांना सांगितले की, 31 डिसेंबर रोजी ती पुस्तक खरेदी करण्यासाठी गेली असता शेजारी राहणारा एक तरुण तिला भेटला आणि सासऱ्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले आणि तातडीने घरी बोलावले.

Rape at gunpoint with a married woman who went to the market to buy a book | पुस्तक खरेदीसाठी बाजारात गेलेल्या विवाहितेसोबत बंदुकीच्या धाकावर बलात्कार

पुस्तक खरेदीसाठी बाजारात गेलेल्या विवाहितेसोबत बंदुकीच्या धाकावर बलात्कार

राजस्थानच्या भरतपूरमध्ये २४ वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जिथे पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलेवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार करण्यात आला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, 31 डिसेंबर रोजी ती पुस्तक खरेदी करण्यासाठी गेली असता शेजारी राहणारा एक तरुण तिला भेटला आणि सासऱ्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले आणि तातडीने घरी बोलावले. त्यानंतर ती ताबडतोब गाडीत बसली. मात्र, वाटेत आरोपीने तिला नशेचा पदार्थ देऊन बेशुद्ध केले.

यानंतर हॉटेलच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. पीडितेने सांगितले की, आरोपीने यापूर्वी फतेहपूर सिक्री आणि मथुरा येथील अनेक हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. अनेकदा तिला व त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकीही देतो.

बंदुकीच्या धाकावर विवाहित महिलेवर बलात्कार

पीडितेचा पती बल्लभगड येथे मजुरीचे काम करतो. 25 जानेवारी रोजी घरी आल्यावर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची पतीला माहिती दिली. त्यानंतर तिने कुटुंबीयांसह महिला पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही

पीडितेने सांगितले की, ती पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी परीक्षेची तयारी करत आहे. त्यासाठी ती शहरात भाड्याच्या घरात तर मुलगी गावात आजी-आजोबांसोबत राहते. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

Web Title: Rape at gunpoint with a married woman who went to the market to buy a book