Rajasthan Saddened by his wife saying 'crazy' on the phone; Husband commits suicide by hanging | बायको ‘पागल’ म्हणाली म्हणून दु:ख अनावर; नवऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

बायको ‘पागल’ म्हणाली म्हणून दु:ख अनावर; नवऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

जयपूर – राजस्थान जयपूरमध्ये एका किरकोळ कारणावरुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्याम नगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार जयपूरच्या श्याम नगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या रवी कुमार यांनी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी कुमार नोकरीच्या निमित्ताने जयपूर येथे राहत होता. मृत्युपूर्वी रवी कुमारने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये त्याने सांगितले की, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण आज ती मला पागल म्हणाली त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कामाच्या निमित्ताने जयपूर येथे राहत होता. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब बिहारला त्याच्या मूळ गावी आहे. मंगळवारी दुपारी रवीने जयपूर येथे राहत्या घरात आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी रवीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये आत्महत्या का केली याचं कारण त्याने सांगितले आहे.

रवी कुमार आणि त्याच्या बायकोमध्ये फोनवरुन भांडण झालं. यावेळी बायकोने रागात रवीला पागल म्हणाली होती. मात्र पागल म्हणाल्याने रवीला ते सहन झालं नाही. माझे पत्नीवर खूप प्रेम आहे. पण ती मला पागली म्हणाली, त्यामुळे मला दु:ख झालं आहे. म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे असं रवीने व्हिडीओत नमूद केले आहे. घरातील केबरच्या वायरीने मंगळवारी दुपारी रवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बिहारमधील रवी कुमारच्या घरच्यांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत असंही पोलिसांनी सांगितले.  तत्पूर्वी मृतदेहाची कोरोना चाचणीही करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या रवीचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवगृहात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Rajasthan Saddened by his wife saying 'crazy' on the phone; Husband commits suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.