राजस्थान : बंदुकीचा धाक दाखवत गुंडांनी पळवली पोलिसांचीच गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:45 AM2021-07-21T08:45:19+5:302021-07-21T08:47:11+5:30

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये लूटपाटीची एक निराळीच घटना समोर आली आहे. गुन्हेगारांनी थेट पोलिसांचीच गाडी पळवल्याची घटना या ठिकाणी घटली आहे.

Rajasthan police looted at sikri at gunpoint by criminals | राजस्थान : बंदुकीचा धाक दाखवत गुंडांनी पळवली पोलिसांचीच गाडी

राजस्थान : बंदुकीचा धाक दाखवत गुंडांनी पळवली पोलिसांचीच गाडी

Next
ठळक मुद्देराजस्थानमध्ये लूटपाटीची एक निराळीच घटना समोर आली आहे. गुन्हेगारांनी थेट पोलिसांचीच गाडी पळवल्याची घटना या ठिकाणी घटली आहे.

आपण लूटपाटीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु राजस्थानमधून लूटपाटीची एक अनोखी घटना समोर आली आहे. गुंडांनी थेट बंदुकीचा धाक दाखवत पोलिसांचीच गाडी पळवल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. गुंडांनी एसएचओ आणि हेड कॉन्स्टेबल यांच्यावर गोळ्या चालवत त्यांची गाडी लूटली. या दरम्यान हेड कॉन्स्टेबल जखमी झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जयपूरमध्ये तैनात असलेले सीआय नरेंद्र खिंचड आणि हेड कॉन्स्टेबल मनेंद्र यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सीकरच्या रानोली येथे जयपूर डीएसटी वेस्ट प्रभारी नरेंद्र खिंचड आणि हेड कॉन्स्टेबल मनेंद्र हे सोमवारी रात्री एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी त्या ठिकाणी बसलेल्या दोन जणांनी पोलिसांना बंदूकीचा धाक दाखवत गाडीची जावी मागितली. 

परंतु ज्यावेळी त्यांनी आपण पोलीस असल्याचं सांगितलं त्यावेळी गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मनेंद्र हे जखमी झाली. परंतु परिस्थिती पाहता दोघांनीही गुंडांना गाडीची जावी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सीकर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मनेंद्र यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल केलं. या गुन्हेगारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. 

Web Title: Rajasthan police looted at sikri at gunpoint by criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app