धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:51 IST2021-07-07T19:50:32+5:302021-07-07T19:51:23+5:30

पीडितेने सांगितलं की, माझ्या पतीचा अपघात झाल्याचं खोटं कारण सांगत तो तरूण मला घेऊन गेला आणि दुसऱ्या गावात नेऊन तिघांनी अत्याचार केला.

Rajasthan bharatpur woman gangrape husband accident excuse | धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप

धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप

राजस्थानच्या भरतपूरमधून एका महिलेवर गॅंगरेपची धक्कादायक घटना  घडली आहे.  असं सांगितलं जात आहे की, एक नराधम आधी महिलेकडे गेला आणि म्हणाला की, तुमच्या पतीचा अपघात झालाय. यानंतर हा बदमाश व्यक्ती महिलेला खोटं सांगत एका गावात घेऊन गेला. आणि तिथे तिच्यावर गॅंगरेप केला. 

ही घटना भरपूर परिसरातील एका गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, एक तरूण महिलेच्या घरी आला आणि म्हणाला की, तुमच्या पतीचा अपघात झाला आहे.  यानंतर महिला या तरूणासोबत त्याच्या बाइकवर निघून गेली. तरूण महिलेला दुसऱ्याच गावातील अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याचे दोन इतर साथीदारही होते आणि नंतर तिघांनीही महिलेवर अत्याचार केला.  (हे पण वाचा : धक्कादायक! पत्नी बाजूला झोपलेली असताना अज्ञाताकडून पतीचा मर्डर, काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न)

पीडितेने सांगितलं की, माझ्या पतीचा अपघात झाल्याचं खोटं कारण सांगत तो तरूण मला घेऊन गेला आणि दुसऱ्या गावात नेऊन तिघांनी अत्याचार केला. पीडितेचा आरोप आहे की, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यावरही काहीच कारवाई केली नाही. तेच पोलीस अधिकारी सत्य प्रकाश म्हणाले की, एका महिलेने गॅंगरेपची तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: Rajasthan bharatpur woman gangrape husband accident excuse