शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:16 IST

हे सर्च ऑपरेशन म्हणजे राजा रघुवंशी हत्येशी संबंधित तपासाचा एक भागा असल्याचे गुन्हे शाखेच्या ACP पूनमचंद यादव यांनी म्हटले आहे...

संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासाला आता वेग आला आहे. मेघालय पोलिसांच्या चमूने इंदूर गुन्हे शाखेच्या साथीने मंगळवारी इंदूरमधील नंदबागमध्ये विशाल उर्फ विक्की चौहानच्या घरावर छापा टाकला आणि तेथे सर्च ऑपरेशन केले. या सर्च ऑपरेशनमध्ये पुलिसांनी काही कपडे जप्त केले आहेत. जे परिधान करून विशालने राजा रघुवंशीची हत्या केली होती. याशिवाय इतरही काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

चावी गायब, गेटवरून उड्या मारून छापेमारी - विशालच्या घरी पोहोचलेल्या पोलिसांच्या चमूला घराची चावी मिळाली नाही. यानंतर पोलिसांनी गेट ओलांडून आरोपीच्या घरात प्रवेश केला आणि घराची झाडाझडती घेतली. यावेळी, हे सर्च ऑपरेशन म्हणजे राजा रघुवंशी हत्येशी संबंधित तपासाचा एक भागा असल्याचे गुन्हे शाखेच्या ACP पूनमचंद यादव यांनी म्हटले आहे.

कपडे महत्वाचा पुरावा - सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या घरातून पोलिसांना काही महत्त्वाचे साहित्य सापडले आहे. इंदूर गुन्हे शाखेने यासंदर्भात अद्याप पूर्ण माहिती दिलेली नाही. तथापि, सर्वात महत्वाचे ते कपडेच आहेत, ज्यांवर रक्ताचे डाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अटकेतील आरोपी असे -राज कुशवाह - हा सोनमच्या वडिलांच्या दुकानात काम करत होता. मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. सोनम सोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू होते.

विशाल चौहान - रॅपिडो बाइक चालवतो. राजचा मित्र आहे. ललितपूरचा रहिवासी आहे.

आकाश राजपूत - बेरोजगार आहे, इंदूरमध्ये राहतो, राजच्याच मोहल्ल्यात राहतो.

आनंद कुर्मी - याला बीना येथून अटक करण्यात आली. हा सागर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सुपारी किलिंगमध्ये सामील.

सोनम रघुवंशी - राजाची पत्नी, हत्येची मास्टरमाइंड, प्रियकर राजसाठी पतीची हत्या करवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट