राधिका यादव हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलमधून तपास करत आहेत. टेनिसपटू राधिकाची तिच्याच जन्मदात्या वडिलांनीच हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडील दीपक यादवला अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्यानुसार, राधिका यादव हत्या प्रकरणात पोलीस तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची चौकशी करत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप राधिकाचं कोणतंही एक्टिव्ह अकाउंट सापडलेलं नाही.
राधिकाचं अकाउंट कोणी डिलीट केलं का?
या हत्या प्रकरणाचा तपास आता राधिका यादवच्या सोशल मीडिया अकाउंट्सपर्यंत पोहोचला आहे. राधिकाच्या हत्येनंतर तिचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानक गायब झाले आहेत. पूर्वी ही अकाउंट्स बरीच एक्टिव्ह होती. राधिका देखील या अकाउंट्सवर सतत पोस्ट करत असे. पोलिसांना संशय आहे की कोणीतरी हे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स जाणूनबुजून इन एक्टिव्ह केले आहेत. हे अकाउंट्स कोणी डिलीट केले का याचाही तपास केला जात आहे.
अचानक अकाउंट्स कसे झाले गायब?
पोलिस आता या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत की, हे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानक कसे गायब झाले? हे अकाउंट्स हत्येच्या अगदी आधी डिलीट केले गेले होते की कोणीतरी हत्येनंतर जाणूनबुजून डिलीट केले होते, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात राधिकाच्या कुटुंबीयांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
राधिकाचा व्हिडीओ आला समोर
राधिका यादव हत्या प्रकरणानंतर आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या युजरने युट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राधिका एका गाण्यात दिसली आहे. असं म्हटलं जातं की, राधिकाचे वडील दीपक यादव हे मुलीच्या या व्हिडीओ शूटमुळे खूप संतापले होते. आता अशा परिस्थितीत राधिकाची हत्या याच व्हिडिओमुळे झाली का? हा तपासाचा विषय आहे.
राधिका होती उत्तम टेनिसपटू
पोलिसांनी आरोपी दीपक यादवला अटक केली आहे. परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आला आहे. राधिका यादव ही हरियाणाची उत्तम टेनिसपटू होती. तिने राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. २३ मार्च २००० रोजी जन्मलेल्या राधिकाला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये युगल टेनिसपटू म्हणून ११३ वं रँकिंग मिळालं होतं.