निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:49 PM2021-06-16T18:49:35+5:302021-06-16T18:50:30+5:30

Suspended IPS Manilal patidar : आता पोलिसांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Property of suspended IPS officer to be seized; Property is in Rajasthan, Gujarat | निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी 

निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी 

Next

उत्तर प्रदेशातील वॉन्टेड गुन्हेगार आणि निलंबित आयपीएस मणिलाल पाटीदार अद्याप फरार आहे. मणिलाल पाटीदार यांची माहिती देणार्यास पोलिसांनी नुकतेच एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मणिलाल बर्‍याच दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिलाल पाटीदार यांची राजस्थान आणि गुजरातमध्ये मालमत्ता आहे. ही मालमत्ता जप्त करण्याची तयारी पोलिसांनी केली असून लवकरच यासंदर्भात कोर्टाची परवानगी घेण्यात येणार आहे. मणिलालच्या वडिलांचे राजस्थानमधील डूंगरपूर जिल्ह्यातील गावात एक घर आहे आणि अहमदाबादमध्ये त्याच्या नावाचा फ्लॅट आहे.

नुकताच प्रयागराज एसपी क्राइम आशुतोष मिश्रा यांच्या नेतृत्वात एक पथक राजस्थानला गेले आहे. तेथे जाऊन पोलिसांनी मणिलाल पाटीदार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली होती.



संपूर्ण प्रकरण काय आहे?
मणिलाल त्रिपाठी हे महोबाचे एसपी होते. महोबा येथील कबरई पोलिस स्टेशन भागात राहणारा क्रशर व्यावसायिक इंद्रकांत त्रिपाठी याला 8 सप्टेंबर 2020 रोजी संशयास्पदरित्या गोळ्या घालण्यात आल्या. उपचारादरम्यान इंद्राकांतचा १३ सप्टेंबर रोजी कानपूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इंद्रकांत यांच्या निधनानंतर त्याचा भाऊ रविकांत यांनी तत्कालीन एसपी मणिलाल पाटीदार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Web Title: Property of suspended IPS officer to be seized; Property is in Rajasthan, Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.