शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

फेसबुकवरचा फोटो बदलला गेला अन् पोलिसांना मुलीचा किडनॅपर सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:37 PM

८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ठळक मुद्दे फेसबुकवरील प्रोफाईल फोटो बदल्यावरून पत्ता शोधून काढला आहे. आरोपीचं नाव विशाल धनराज वाईकर (२५) असं आहे.

पुणे - पुण्यातील एमआयडीसी भोसरी परिसरातून नऊ महिन्यांपूर्वी १५ वर्षीय मुलीला पूस लावून पळून नेलं होतं. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय मुलीचा पोलिसांना आरोपीने फेसबुकवरील प्रोफाईल फोटो बदल्यावरून पत्ता शोधून काढला आहे. आरोपीचं नाव विशाल धनराज वाईकर (२५) असं आहे. रविवारी त्याला शिवाजी नगर कोर्टात पोलिसांनी हजर केले असता त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी एमआयडीसी भोसरी येथील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या विशालने १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पूस लावून पळवून गेले. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे मुलीचे आई - वडील देखील नोकरी करतात. ३१ डिसेंबरला त्यांच्या अल्पवयीन मुलीला पूस लावून विशालने पळून नेले होते. मोबाईल फोन्स देखील दोघांनी घरीच ठेवले आणि पळून गेले होते. त्यानंतर मावळ येथील एमआयडीसी फ्लोरिकल्चर पार्कमध्ये माळ्याचे काम विशाल आणि अल्पवयीन मुलगी करत होती. दरम्यान २ जानेवारी २०१९ रोजी मुलीच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस नऊ महिने या मुलीचा माग काढत होते. दरम्यान, विशाल वाईकरने फेसबुकवर प्रोफाईल फोटो बदल्याने पोलिसांना मुलीचा पत्ता लागला आणि मोबाईलमध्ये फेसबुक ऍक्टिव्हेट असल्याने सोशल मीडियाद्वारे पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि तळेगाव येथून पोलिसांनी शनिवारी अटक केली. विशालविरोधात भा. दं. वि. कलम ३६३, ३७६ (१), ३६६, ४१७, आणि पॉक्सो कायदा कलम ३, ४, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :ArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदाKidnappingअपहरणPoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी