शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 3:55 PM

Filed a case against BJP MP Ramdas Tadas : वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ठळक मुद्देया पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्धा : वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदाररणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसआमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आ. रणजित कांबळे यांनी देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनाही अश्लिल शिवीगाळ केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संकटाच्या काळात सेवा देणारे देवळीचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांना देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात कुठलीही परवानगी न घेता कोविड चाचणी शिबीर घेतल्याचे कारण पुढे करून अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध देवळी पोलिसात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड संकटाच्या काळातच कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध  वर्धा शहर पोलीस ठाण्यानंतर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तळात उलट-सुटल चर्चेला उधाण आहे आहे. देवळी येथील दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत.कांबळेंना अटकेसाठी भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशाराआरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवानिशी ठार करण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रकर परिषदेतून दिला होता. 

टॅग्स :Policeपोलिसcongressकाँग्रेसBJPभाजपाMember of parliamentखासदारMLAआमदारArrestअटकRanjit Kambleरणजित कांबळे