उत्तर प्रदेशपोलिसांच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तस्करी प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे जप्त झाले की पैसे मोजून मोजून हात दुखले. पोलिसांना सलग २२ तास बसून पैसे मोजावे लागले. प्रतापगडमधील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंडीपूर गावात अचानक पोलिसांच्या अनेक गाड्या आल्या. आता जेलमध्ये असलेला गँगस्टरच्या राजेश मिश्रा याच परिसरातून त्याचं संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळली.
जेव्हा पोलिसांनी राजेश मिश्राच्या घरावर छापा टाकला तेव्हा सुरुवातीला दरवाजा आतून बंद होता. रीना मिश्रा (राजेशची पत्नी), मुलगा विनायक, मुलगी कोमल आणि नातेवाईक यश आणि अजित मिश्रा उपस्थित होते. जेव्हा दार उघडलं तेव्हा उघड तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. संपूर्ण खोलीत काळ्या कागदात गुंडाळलेल्या चलनी नोटांचे गठ्ठे, बॉक्समध्ये पॅक केलेला गांजा आणि लोखंडी ट्रंकमध्ये स्मॅक साठवला होता.
२,०१,५५,३४५ किमतीची रोख रक्कम जप्त
एका कोपऱ्यात एक इलेक्ट्रॉनिक पैसे मोजण्याची मशीन होती, ज्यामुळे हे स्पष्ट होते की ही गँग केवळ तस्करीतच सहभागी नव्हती तर पैसे मोजण्याची संपूर्ण यंत्रणा देखील त्यांच्याकडे होती. पोलिसांनी मोजणी सुरू केली तेव्हा ₹२,०१,५५,३४५ किमतीची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, त्यांना ६.०७५ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मॅक (हेरॉइन) सापडले, ज्याची एकूण किंमत अंदाजे ३ कोटींपेक्षा जास्त आहे. ही कारवाई फक्त तीन तास चालणार होती, परंतु मोजणी पूर्ण करण्यासाठी २२ तास लागले.
जेलमधून सुटका करण्यासाठी बनावट कागदपत्रं
तपासात असे दिसून आले की रीना मिश्रा आणि तिचा मुलगा विनायक मिश्रा यांनी राजेशची जेलमधून सुटका करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती आणि न्यायालयात जामीन मिळवला होता. या खुलाशानंतर, त्यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आणि गुंड कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या नोंदींवरून असे दिसून येते की कुटुंबाची ₹३,०६,२६,८९५.५० किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता यापूर्वी जप्त करण्यात आली होती.
जेलबाहेर पत्नी आणि मुलगा चालवत होते गँग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मिश्रा आधीच अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी आहे. जेलबाहेर त्याची पत्नी आणि मुलं त्याचं काम करत होती. तो फोन कॉल आणि मीटिंदद्वारे गँगला सूचना देत असे, ज्यामध्ये वस्तू कुठून घ्यायच्या, कुठे पोहोचवायच्या आणि प्रत्येक पोलीस अधिकारी कधी ड्युटीवर असतो यासारख्या सूचना देत असे. ही गँग आंतरराज्यीय सक्रिय होती, ज्याचं नेटवर्क बिहार आणि मध्य प्रदेशपर्यंत पसरलेले होते. प्रतापगड, प्रयागराज आणि कौशांबीमधील अनेक गावं या नेटवर्कसाठी काम करत होती.
Web Summary : Police raided a gangster's home, uncovering crores in cash, drugs, and fake documents. A 22-hour counting marathon revealed over ₹2 crore. His family managed the network while he was jailed.
Web Summary : पुलिस ने एक गैंगस्टर के घर पर छापा मारा, जिसमें करोड़ों नकद, ड्रग्स और जाली दस्तावेज बरामद हुए। 22 घंटे की गिनती में ₹2 करोड़ से अधिक का खुलासा हुआ। जेल में रहते हुए उसका परिवार नेटवर्क चलाता था।