पूजा चव्हाण कुटुंबीयांचा निर्वाणीचा इशारा; "मृत्यूपेक्षा बदनामी होतेय, ती थांबवा, अन्यथा..."

By पूनम अपराज | Published: February 26, 2021 04:38 PM2021-02-26T16:38:13+5:302021-02-26T17:17:50+5:30

Pooja Chavan Case : या प्रकरणात आता पूजाच्या कुटुंबीयांनी मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात असल्याने ती थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

Pooja Chavan family's warning ; "It's more defame than death, stop it, otherwise ..." | पूजा चव्हाण कुटुंबीयांचा निर्वाणीचा इशारा; "मृत्यूपेक्षा बदनामी होतेय, ती थांबवा, अन्यथा..."

पूजा चव्हाण कुटुंबीयांचा निर्वाणीचा इशारा; "मृत्यूपेक्षा बदनामी होतेय, ती थांबवा, अन्यथा..."

Next
ठळक मुद्देसंतप्त होऊन लहू चव्हाण यांनी सांगितले, उद्यापासून बदनामी थांबिवली नाहीतर आम्ही कुटुंबीय कोर्टासमोर येऊन आत्महत्या करणार. 

परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येसाठी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचं आरोप भाजपाने केला आहे, सध्या पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याने शिवसेनेने वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यातच भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी संजय राठोड यांच्या अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणात आता पूजाच्या कुटुंबीयांनी मृत्यूपेक्षा बदनामी जास्त केली जात असल्याने ती थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

 

आधी याप्रकरणी पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माझ्या मुलीची बदनामी थांबवा असे आवाहन केले होते. मात्र, आज पूजाची आई मंडूबाई चव्हाण यांनी माझ्या मुलीची बदनामी थांबवा, नाहीतर आम्ही सर्वजण आत्महत्या करणार असे अश्रू ढाहळत टीव्ही ९ शी बोलताना सांगितले. तिच्या मृत्यूपेक्षा बदनामी खूप केली जात आहे. माझ्या पोटचा गोळा गेला, त्या दुःखात असून ही नाहक बदनामी केली जात आहे. त्यांना पोरी नाहीत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच चौकशी देखील याप्रकरणी केली पाहिजे, अरुण राठोड कोण त्याला आम्ही ओळखत नाही, विलास चव्हाण याला पाचही मुली राखी बांधायच्या. तो मानलेला भाऊ होता, असे त्या म्हणाल्या. तसेच पूजाची दहावीत शिकणारी बहीण म्हणाली, माझी बहीण वाघीण होती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचे फोटो पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यासोबत देखील आहेत, ते व्हायरल का नाही केले, ते पुरुषासोबत नाहीत म्हणून का? एका मुलीचे फोटो व्हायरल कसे केले जातात, त्यांना हा अधिकार कोणी दिला. 

 

 

 

पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी टीव्ही९ शी बोलताना सांगितले की, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात काय झाले माहिती नाही. कोणीही येतं नातलग म्हणून सांगून काहीही बोलतात. तुम्ही शहानिशा न करता कसं दाखवता. माझे नातलग माझ्यासोबत आहेत. माझ्या दुःखात सहभागी आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. मग राजकारण का केलं जातंय?, कोण आहे चित्रा असे पुढे लहू चव्हाण म्हणाले. संतप्त होऊन लहू चव्हाण यांनी सांगितले, उद्यापासून बदनामी थांबिवली नाहीतर आम्ही कुटुंबीय कोर्टासमोर येऊन आत्महत्या करणार. 

Web Title: Pooja Chavan family's warning ; "It's more defame than death, stop it, otherwise ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.