मुलीवर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केला गँगरेप; दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये केले रेकॉर्डिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:29 IST2021-03-26T16:27:59+5:302021-03-26T16:29:10+5:30

Gangrape : २१-२२ मार्च रोजी मध्यरात्री ही भीषण घटना घडली. हिंदी दैनिक हिंदुस्थानच्या वृत्तानुसार पोलिसांनी बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

Polytechnic students gangrape girl; Mobile recording gangrape crime | मुलीवर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केला गँगरेप; दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये केले रेकॉर्डिंग 

मुलीवर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केला गँगरेप; दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये केले रेकॉर्डिंग 

ठळक मुद्देसर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. गौरव, विकास, पुष्पराज आणि सौरभ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी १९-२१ वयोगटातील आहेत.

महोबा: उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत एका २० वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पॉलिटेक्निक विद्यार्थी असल्याचे या चौघांची ओळख पटली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. गौरव, विकास, पुष्पराज आणि सौरभ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी १९-२१ वयोगटातील आहेत.

२१-२२ मार्च रोजी मध्यरात्री ही भीषण घटना घडली. हिंदी दैनिक हिंदुस्थानच्या वृत्तानुसार पोलिसांनी बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेला जबरदस्तीने त्यांच्या खोलीत नेऊन तिचा भंग केला. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, मंगळवारी रात्री चारही तरुणांनी तिच्या निवासस्थानी प्रवेश केला असता ती तिच्या घरी एकटी होती. त्यांनी तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीने पोलिसांकडे तक्रार करण्यास संपर्क साधल्यास गॅंगरेपचा व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली.

 

गुन्ह्यानंतर महिलेला बेशुद्ध अवस्थेत सोडण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्रकुमार गौतम यांनी सांगितले की, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चार पॉलिटेक्निक विद्यार्थी परिसरातील भाड्याच्या घरात राहतात. कोतवाली येथील स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अनूप कुमार दुबे यांनी सांगितले की, "मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना २१-२२ मार्चच्या मध्यरात्री घडली होती, परंतु बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

Web Title: Polytechnic students gangrape girl; Mobile recording gangrape crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.