शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘टेरर फंडिंग’मागे राजकीय कनेक्शन; ‘त्या’ हस्तकांच्या संपर्कात राजकीय नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:04 IST

येत्या काळात काही बडे नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एनआयएने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते मंडळी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट असून, याबाबतही चौकशी करायची असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात काही बडे नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

डी गँगच्या टार्गेट लिस्टवर काही राजकीय नेते आणि बडी मंडळी होती, अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनआयएने दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर, सरकारी वकील संदीप सदावर्ते यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये डी कंपनीचे धागेदोरे अनेक दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत. आरोपी आरीफ शेख आणि शब्बीर शेख यांचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. त्यांच्याकडून पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.  दोन्ही आरोपी डी कंपनीसाठी हवाला ॲापरेट करायचे. मुंबई पश्चिम उपनगरात डी कंपनीचे सर्व व्यवहार दोघे हाताळत होते. दोघेही छोटा शकीलच्या संपर्कात आहेत. छोटा शकील पाकिस्तानातून जे ‘क्रिमिनल सिंडिकेट’ चालवतो त्या ‘सिंडिकेट’मध्ये दोन्ही आरोपी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती सदावर्ते यांनी न्यायालयात दिली. तसेच, खंडणी, अमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आढळले असल्याचेही नमूद केले.  हे दोन्ही आरोपी दाऊद आणि छोटा शकीलच्या संपर्कात होते, असे पुरावे एनआयएकडे आहेत.

१९९३ च्या बॉम्बस्फोटात निर्दोषदोघेही १९९३ च्या बॉम्बस्फोटात निर्दोष सुटले होते. मात्र, त्यानंतरही त्यांचे डी गँगसाठीचे काम सुरू होते. याबाबत त्यांच्याकडे एनआयएकडून चौकशी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आरोपींनी कोर्टात गायले ‘सारे जहाँ से अच्छा’दोन्ही आरोपींनी कोर्टात माहिती देताना आम्ही काहीही केलेले नाही, आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो, असे सांगत ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत म्हटले. तसेच,  दोन्ही आरोपींनी सरकारी वकिलाची मागणी केली आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPoliticsराजकारणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा