शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अभिनेत्रीसमोर अश्लील वर्तन, विकृत दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:37 IST

अभिनेत्रीने घडलेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही माहिती व्हायरल झाली.

पणजी : मोटारसायकलवरून आलेल्या एका विकृत व्यक्तीने अभिनेत्रीसमोर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार राजधानी पणजीतील एका रस्त्यावर घडला. 'त्या' अभिनेत्रीने हा प्रकार सोशल मीडियावर 'पोस्ट' करून उघड केला. यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीची तक्रार घेत संशयिताचा तपास सुरु केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पाटो-पणजी येथील एका बँकेसमोरील रस्त्यावरून अभिनेत्री आणि तिची मैत्रिण जात असताना संशयित पिवळ्या वेस्पा स्कूटरवरून आला आणि तिच्याशी 'एक्स्युझ मी' असे म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर त्याने तिच्या समोरच अश्लिल वर्तन सुरू केले.

राजधानीत भररस्त्यावर हे विकृतीचे प्रदर्शन घडविण्याची आगळीक त्या संशयिताने केली. या अभिनेत्रीने घडलेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही माहिती व्हायरल झाली. दरम्यान, पोलिसांनी अभिनेत्रीशी संपर्क साधून तक्रार नोंदवून घेतली. तसेच, अज्ञाताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. 

दरम्यान, रस्त्याच्या आजूबाजूला उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवून संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी समाज माध्यमावर ट्विट करून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा