Police investigate Shiv Sena MLA over Karnataka explosive | कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी 
कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी 

ठळक मुद्दे महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ; एसआयटीच्या पथकाकडून सखोल चौकशी कोल्हापूरचे एटीएसचे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कोल्हापूर - कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटातील बकेटवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असा कन्नड, तामिळी आणि इंग्रजी भाषेत नामोल्लेख आढल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी आमदार आबिटकर यांचेकडे तासभर चौकशी केली. या प्रकरणाशी काही संबध नसून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटूंबियांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. कोल्हापूरचे एटीएसचे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

स्फोटकावर शिवसेनेचे आमदार आबिटकर यांच्या नावाचा उल्लेख मिळून आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. आबिटकर हे राधानगरी-भुदरगड येथील विद्यमान आमदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असल्याने कोल्हापूरसह कर्नाटक एटीएस, एसआयटीसह रेल्वे पोलीसांचे त्यांचेकडे लक्ष लागले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी याप्रकरणी आमदार आबिटकर यांचेकडे तासभर चर्चा केली. कर्नाटकशी तुमचे काही कनेकशन आहे का, काही व्यवहार आहेत का, कोणी तुमच्याकडून दूखावले आहे का आदी माहिती घेतली. विधानसभा निवडणुक कालावधीत आबिटकर यांचा नामोल्लेख स्फोटकांच्या बकेटवर कसा आला, त्या यंत्रणेपर्यंत पोहचण्यासाठी कोल्हापूर आणि कर्नाटक पोलीस संयुक्त तपास करीत असलेचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

 

बदनामीचे षडयंत्र - प्रकाश आबिटकर
सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरताना अशा घटनांशी आपला यापूर्वी कधीही दुरान्वयेही संबध आला नाही. दिवसभर आपल्या नावाची मिडीयाद्वारे चर्चा पुढे आल्याने आपण स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेवून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी क ेली आहे. आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित रॅकेटचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे. 


Web Title: Police investigate Shiv Sena MLA over Karnataka explosive
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.