शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 20:45 IST

Crime News : आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक, २१ गाड्या जप्त

ठळक मुद्देटोळीचा सूत्रधार पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला आहे.

नवी मुंबई : गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने ताब्यात घेऊन चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व वाहने बनावट कागदपत्रांद्वारे राज्याबाहेर विकण्यात आली होती.नेरुळ येथे ट्रॅव्हल पॉईंट नावाने कार्यालय थाटून हा गुन्हा घडला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्याच्या अनुशंघाने गुन्हे शाखेचे मध्यवर्ती शाखेचे पथक तपास करत होते. यादरम्यान भोईसर येथून एकाला अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराची माहिती समोर आली होती. त्याला  इतर साथीदारांसह बेंगलोर येथून अटक केली आहे. आशिष पुजारी उर्फ अँथोनी पॉल, सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू, अयान उर्फ अँथोनी पॉल छेत्तीयार, मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख व जावेद अब्दुलसत्तार शेख अशी त्याची नावे आहेत. त्यांच्याकडून फसवणूक करून चोरलेल्या 1 कोटी 21 लाख रुपये किमतीच्या महागड्या 20 गाड्या जप्त केल्या आहेत. 

या टोळीवर मुंबई, नवी मुंबई तसेच पुणेत गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये पुणेतून 79 तर दिंडोशी येथून 10 गाड्या चोरल्या होत्या. त्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, स्कॉर्पिओ, वॅग्नार, सँट्रो, डिझायर अशा विविध प्रकारच्या गाड्या आहेत. यापैकी काही गाड्या दमन येथे दारूच्या तष्करीसाठी वापरल्या जात होत्या. तशा नेरुळ येथून चोरलेल्या 14 पैकी 09 गाड्या दमन येथे दारू तष्करी प्रकरणी जप्त केलेल्या आहेत. या टोळीने राज्यभरातून 300 हून अधिक गाड्या चोरी करून गुजरात, राजस्थान तसेच नेपाळ येथे विकल्याचे शक्यता आहे.आलिशान हॉटेल किंवा कंपनीमध्ये भाड्याने लावण्यासाठी या गाड्या घेतल्या होत्या. त्याकरिता वाहन चालकासोबत लिखित करार करून सुरवातीचे दोन ते तीन महिने नियमित भाडे द्यायचे. मात्र त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढायचे.नेरुळ येथे असाच गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोरकर, राहुल वाघ, विजय खरटमोल, किरण राऊत, मिथुन भोसले, नितीन जगताप, प्रकाश साळुंखे, मेघनाथ पाटील, विष्णू पवार, पोपट पावरा, आतिष कदम, सतीश सरफरे, सचिन टिके, सतीश चव्हाण व रुपेश कोळी यांचे पथक तयार केले होते. अटक केलेल्या टोळीचा नवी मुंबईतला नववा गुन्हा असून यापूर्वी मुंबईत त्यांना अटक देखील झालेली आहे. मात्र टोळीचा सूत्रधार पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला आहे.

टॅग्स :RobberyचोरीcarकारPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईArrestअटक