शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस शिपायास अटक; आई-वडील आणि बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 00:51 IST

या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायासह त्याचे आई - वडील व बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस पतीला अटक केली असून त्याला ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मीरारोड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नवऱ्याच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायासह त्याचे आई - वडील व बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस पतीला अटक केली असून त्याला ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात २०२३ साली भरती झालेला मूळचा बुलढाण्याच्या अंढेरा गावचा प्रभू भगवान चाटे ( वय २७) रा. लक्ष्मी पार्क, मीरारोड हा पोलीस शिपाई मीरारोड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. २९ एप्रिल २०२५ रोजी त्याचे लग्न पुण्याच्या कात्रज गावातील  स्वाती डोंगरे ( वय १९) हिच्याशी झाला होता. चाटे हा नेहमीच मद्यपान करून येत असल्याने त्यावरून वाद होऊन तिला मारहाण करत होता. 

चाटे ह्याने तत्याच्या भावाची पत्नी गरोदर असल्याने तिच्या मदतीसाठी स्वाती हिला  पुण्याला पाठवले होते. तिकडे चाटे ह्याची बहीण पुष्पा सुभाष सानप (वय ३०) , आई रंजना ( वय ५५) व वडील भगवान ( वय ६३) रा. घोटवडे फाटा, पुणे हे स्वाती हिच्यावर संशय घेऊन त्रास देत होते. २ नोव्हेम्बर रोजी  चाटे हा स्वातीसह मीरारोड  मध्ये राहू लागला.  स्वाती हि गर्भवती असल्याने चाटे हा दारू पिऊन तिच्यावर संशय घेऊन हे मूल माझे नसून डीएनए चाचणी कर असे सांगून मानसिक छळ करत होता. सदर छळा बद्दल  स्वाती हि तिच्या आईला वेळोवेळी सांगत असे. 

मात्र २७ नोव्हेम्बर रोजी गर्भवती असणाऱ्या स्वातीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वरील प्रमाणे स्वातीच्या आई दुर्गा डोंगरे यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलिसांनी २८ नोव्हेम्बर रोजी प्रभू चाटे सह त्याचे आई - वडील व बहीण विरुद्ध गुन्हा दाखल करून चाटे ह्याला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सय्यद जिलानी तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cop arrested for driving pregnant wife to suicide; family booked.

Web Summary : A Mira Road police constable was arrested for allegedly driving his pregnant wife to suicide due to harassment. The constable, his parents, and sister have been booked. The victim faced dowry demands and suspicion of infidelity, leading to her tragic death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस