अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 10:11 PM2020-05-09T22:11:13+5:302020-05-09T22:15:20+5:30

आज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे.

Police arrested those who spread rumors about Amit Shah's health pda | अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देगुजरात पोलिसांनी दोघांना अहमदाबाद तर दोघांना भावनगर येथून ताब्यात घेतले आहे. काही मित्रांनी सोशल मि़डीयावर माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या.

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून एरव्ही राजकारणात कमालीचे ऍक्टिव्ह असलेले भाजपाचे चाणक्य अमित शहा कुठेच दिसले नव्हते. यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. आज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. गुजरातपोलिसांनी दोघांना अहमदाबाद तर दोघांना भावनगर येथून ताब्यात घेतले आहे. 

काही मित्रांनी सोशल मीडियावर माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या. एवढेच नाही तर काहींनी माझ्या मृत्यूसाठीही प्रार्थना केली आहे. देश कोरोनासारख्या जागतिक महामारीविरोधात लढत आहे आणि मी गृहमंत्री म्हणून दिवसरात्र कामात व्यस्त होतो. यामुळे या अफवांकडे लक्ष दिले नव्हते. जेव्हा माझ्या हे लक्षात आले, तेव्हा मी यावर खुलासा न करण्याचाच निर्णय घेतला.

Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक 

 

काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच 

 

मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील 

मात्र, माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून चिंता व्यक्त केली, त्यांच्यासाठी मला समोर यावे लागत असल्याचे शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी पूर्णपणे ठणठणीत असून मला कोणताही आजार नाहीय. हिंदू धर्माानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

Web Title: Police arrested those who spread rumors about Amit Shah's health pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.