शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर बळजबरी करणाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 20:41 IST

तरुणीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गुरूकर तपास करीत आहे.आरोपी राजेश सुरेश कांबळी रा.कोंढाळा हा रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास देसाईगंजवरून आपल्या गावाकडे दुचाकीने निघाला होता.

देसाईगंज (गडचिरोली) - एकांतवासाचा फायदा घेत एका तरुणीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. पीडित तरुणी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. दरम्यान, उशिरा झाल्यामुळे आरोपीला मंगळवारी न्यायालयात उभे करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी राजेश सुरेश कांबळी रा.कोंढाळा हा रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास देसाईगंजवरून आपल्या गावाकडे दुचाकीने निघाला होता. पीडित तरुणीलाही तिकडेच जायचे असल्यामुळे आणि तरुण ओळखीचा असल्यामुळे तिने त्याला लिफ्ट मागितली. पण आरोपी राजेश याने तिला कोंढाळ्याऐवजी शिवराजपूर रस्त्यावरील राईस मिलजवळ नेले आणि अंधाराचा व तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी बळजबरी केली.

पीडित तरुणीने हा प्रकार तिथे असलेल्या राईस मिलमधील लोकांना सांगितली. त्यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सदर तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी युवकाविरूद्ध भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर तरुणीला जीवे मारण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसून तशी तक्रारही नसल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सारिका गुरूकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी आरोपी राजेश कांबळी याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गुरूकर तपास करीत आहे.महिलांना लवकर सुट्टी द्यागडचिरोली, देसाईगंजसह अनेक तालुका ठिकाणातील प्रतिष्ठानांमध्ये ग्रामीण भागातील महिला, मुली काम करतात. सायंकाळी त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी पुरेशी साधने नसतात. त्यामुळे अशा सर्व मुली व महिलांना दुकानदारांनी संध्याकाळी लवकर सुट्टी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्त्री शक्ती संघटनेच्या छाया कुंभारे, अश्विनी भांडेकर यांनी केली आहे.

टॅग्स :ArrestअटकGadchiroliगडचिरोलीMolestationविनयभंगPoliceपोलिस