शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात खून करण्याच्या हेतूने फिरणाऱ्यास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:30 IST

खून करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असलेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची सतर्कता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खून करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असलेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मो. इमरान मो. असरार (१९) रा. अन्सारनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. लकडगंज वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे, सहायक उपनिरीक्षक अशोक चरडे, रमेश चकोले, पंकज नागोसे आणि चंद्रकांत कटरे यांना मंगळवारी दुपारी चालानच्या कारवाईसाठी पाचपावलीत तैनात करण्यात आले होते. त्यांना आरोपी बाईकवर संशयास्पद स्थितीत जाताना दिसला. त्यांनी आरोपीस थांबवून कागदपत्र दाखविण्यास सांगितले. त्याने कागदपत्र न दाखविल्यामळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ चाकू आढळला. चाकू आढळल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. इमरानचा एका युवकासोबत वाद सुरु आहे. त्याचा खून करण्याचा इमरानचा विचार होता. त्यामुळे तो दोन साथीदारांसोबत युवकावर हल्ला करण्यासाठी सिंधू कॉलेजजवळ गेला होता. युवक न भेटल्यामुळे तो घरी परत जात होता. दरम्यान पोलिसांनी त्यास पकडले. इमरान आणि त्याच्या साथीदारांना पाचपावली पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे. या कारवाईमुळे वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक