अत्याचार प्रकरणातील पन्हाळ्याच्या पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 08:27 PM2021-10-15T20:27:11+5:302021-10-15T20:27:33+5:30

प्राथमिक तपासात राजेंद्र पाटील याने आत्याचाराचा गुन्हा नाकबुल केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.

Panhala police arrested in atrocity case | अत्याचार प्रकरणातील पन्हाळ्याच्या पोलिसाला अटक

अत्याचार प्रकरणातील पन्हाळ्याच्या पोलिसाला अटक

Next

पन्हाळा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झालेला पोलिस राजेंद्र गणपती पाटील (वय ३२ रा.करंजफेन ता.पन्हाळा) याला पन्हाळा पोलिसांकडुन पहाटे २.३० वाजता कोल्हापूर शिरोली एमआयडीसी येथे त्याचे मित्राच्या घरी अटक केली. पन्हाळा न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
     
प्राथमिक तपासात राजेंद्र पाटील याने आत्याचाराचा गुन्हा नाकबुल केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले. संशयित पोलिस राजेंद्र पाटील हा मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. आपल्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याचे समजताच तो अटकपुर्व जामीन घेण्याच्या तयारीत होता तथापी न्यायालयाला सलग सुट्या असल्याने त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांचे विशेष खबऱ्यामार्फत आरोपीला अटक केल्याचे समजून आले  

पीडित मुलीचा गर्भ डीएनए चाचणीसाठी राखून ठेवला आहे.  दवाखान्यातून तिला सोडताच न्यायालयासमोर जबाब नोंदवून ठेवला जाणार आहे. पिडीत मुलीचे आई,वडील अशिक्षित व गरीब आहेत. वडील मार्केट यार्डात हमालीचे काम  करतात. आरोपी राजेंद्र पाटील हा मुलीच्या वडीलांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवत गुन्हा नोंद होवू नये या दृष्टीने प्रयत्न करत होता तर वडील फक्त मुलीला मोकळी करा म्हणत डाॕक्टरांच्या पाया पडत होते पण शासकिय दवाखान्यातून डाॕक्टर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवून गुन्हा नोंद करत रितसर पुढील कार्यवाही केली. आता डीएनए चाचणी नंतरच तपासाला गती येणार आहे. 

पोलिस निलंबित-

पोलिसमध्ये कार्यरत असणाऱ्या राजेंद्र पाटील याला नोकरीतून निलंबित केल्याचे पोलिसांनी सांगितले.अधिक तपास पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे करत आहेत

Web Title: Panhala police arrested in atrocity case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.