Pakistan's new strategy! Honey trap of ISI for appoint agent in Nashik | पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

ठळक मुद्देनाशिककरांनी अधिकाधिक सतर्कता बाळगत सोशलमिडियावर कोणत्याही अनोळखी महिलेशी चॅटींग करु नये, असेही पाण्डेय म्हणाले.पाकिस्तानच्या एका +९२३०३५३४२२८९ या क्रमांकाच्या ‘सलमान-अब्राहीम’ नावाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे.

नाशिक : शहरासह संपुर्ण देशभरात पाकिस्तानचीआयएसआय नावाची गुप्तहेर संस्था सोशलमिडियाचा वापर करत त्यांच्या विविध विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे देशासह नाशकातसुध्दा ‘हनी ट्रॅप’ लावत आहे. आपल्या देशात त्यांचे ‘एजंट’ तयार करणे हा यामागील पाकिस्तानची मुळ हेतू आहे, असे महत्त्वाचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. नाशिककरांनी अधिकाधिक सतर्कता बाळगत सोशल मिडियावर कोणत्याही अनोळखी महिलेशी चॅटींग करु नये, असेही पाण्डेय म्हणाले.

पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असलेल्या एका विदेशी महिला एजंटला माहिती पुरविल्याच्या संशयावरुन नाशिकमधील ओझर येथील ‘एचएएल’च्या एका कर्मचाऱ्याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती.  त्याने मागील वर्षभरापासून एचएएलमध्ये तयार होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भारतीय बनावटीच्या विमानांची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती त्या विदेशी महिला आयएसआयच्या एजंटला पुरविल्याचे समोर आले आहे. दीपक शिरसाठ अशा या कर्मचाऱ्याचे नाव असून तोदेखील अशाचप्रकारे आयएसआयच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे पाण्डेय म्हणाले.

तसेच देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये छायाचित्रण करताना पकडला गेलेला बिहारचा बांधकाम मजूर संजीव कुमार हादेखील पाकिस्तानच्या एका +९२३०३५३४२२८९ या क्रमांकाच्या ‘सलमान-अब्राहीम’ नावाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे. संजीवकुमार याने प्रतिबंधित क्षेत्राचे काढलेले छायाचित्रे याच ग्रूपमध्ये पाठविल्याचे उघड झाले आहे. यावरुन पाकिस्तानची आयएसआय संघटना हेरगिरीसाठी एजंट तयार करण्याची प्रक्रिया राबवत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

Web Title: Pakistan's new strategy! Honey trap of ISI for appoint agent in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.