पिंपरी परिसरात इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:31 IST2018-11-21T13:29:30+5:302018-11-21T13:31:22+5:30
पुनावळे येथे इमारतीचे पेंटिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला.

पिंपरी परिसरात इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू
पिंपरी : पुनावळे येथे इमारतीचे पेंटिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. राधेशाम रामबच्चन वर्मा (३३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश राधेश्याम बच्चन वर्मा यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत. याप्रकरणी ठेकेदार तुषार पाटील, विजय बालवाडकर यांच्याविरुद्ध कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.