खळबळजनक! योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:23 IST2021-10-12T13:52:24+5:302021-10-12T14:23:14+5:30
Suicide Attempt : गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खळबळजनक! योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाने मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव विमलेश कुमार असे असून तो मैनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. युवकाने सपाच्या नेत्यावर त्यांचे शेत आणि जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. मात्र त्याने अदयाप कोणत्या नेत्याचे नाव घेतले नाही.
रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाला आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, सपाच्या नेत्याने त्या युवकाचं शेत आणि जमीन विकली. त्यांनी डीएम, एसडीएम यांच्याकडेही गेलो पण त्यांनी दाद दिली नाही असा आरोप त्याने केला. तरुणाने असा दावा केला आहे की, तो हताशपणे दोनदा मुख्यमंत्री निवासस्थानी आला होता, पण तिथेही त्याचे म्हणणं ऐकलं गेलं नाही.
तो तरुण म्हणतो की, तो तिसऱ्यांदा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये आला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचा होतं, पण त्याला भेटता आले नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल असे त्यांला सांगण्यात आले.