संतापजनक... नात्याला काळिमा...! अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करत होता बाप, आईनं तयार केला VIDEO अन् मग…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 01:49 IST2026-02-16T01:46:16+5:302026-02-16T01:49:14+5:30
...मग पतीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिने एक योजना आखली आणि त्याच्यावर गुपचूप पाळत ठेवण्यास सुरुवात केली.

संतापजनक... नात्याला काळिमा...! अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करत होता बाप, आईनं तयार केला VIDEO अन् मग…
राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक आणि अक्षरशः माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका धाडसी आईने आपल्याच पतीला आपल्याच चिमुकली सोबत अश्लिल कृत्य करताना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पीडित चिमुकली केवळ अडीच वर्षांची आहे.
पत्नीला आधीच होता संशय -
गेल्या काही दिवसांपासूनच चिमुकलीच्या आईला आरोपी पती आलमच्या हालचालींसंदर्भात संशय होता. तो आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचे करत असल्याचे तिला जाणवत होते. मग पतीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिने एक योजना आखली आणि त्याच्यावर गुपचूप पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
एक दिवस, जेव्हा आलम आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करत होता, तेव्हा चिमुकलीच्या आईने आरडाओरड न करता, अत्यंत धाडसाने आपल्या मोबाईलमध्ये पतिचे संपूर्ण कृत्य कैद केले. व्हिडिओ तयार केल्यानंतर, या धाडसी आईने आपल्या मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांत तक्रार केली. आता हाच व्हिडिओ नराधम बापाविरोधात सर्वात भक्कम पुरावा ठरला आहे.
कठोर कारवाई केली जाणार -
या तक्रारीची दखल घेत खोडा पोलिसांनी तत्काळ आरोपी पिता आलम याला ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा एक अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.