भाऊबंदकीतून कोल्हापूरजवळ एकाचा खून, सख्या भावानेच केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 14:09 IST2021-06-05T14:08:44+5:302021-06-05T14:09:28+5:30
Murder Case : जमिनीच्या वादातून गेले काही वर्षे भाऊ बंदकीत वाद सुरू आहे.

भाऊबंदकीतून कोल्हापूरजवळ एकाचा खून, सख्या भावानेच केले वार
कोल्हापूर: शेत जमीन वादातून करवीर तालुक्यातील वरणगे येथे सख्या भावान धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात भैरवनाथ रामचंद्र बिछडे (वय 55 राहणार वाढलेले मातंग वसाहत) यांचा निर्घुण खून करण्यात आला. सकाळी शनिवारी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
जमिनीच्या वादातून गेले काही वर्षे भाऊ बंदकीत वाद सुरू आहे. भैरवनाथ बुचडे व भगवान बुचडे या दोघा भावात 15 गुंठे शेतजमीन, पाच गुंठे घराच्या जागेत दोघांची घरे आहेत. दरम्यान घराच्या पाठीमागे असणाऱ्या रिकाम्या जागेत भैरवनाथ बुचडे हा गोठा बांधत होता. त्या वादातून भैरवनाथ रामचंद्र भोसले त्याचा मुलगा नाना भोसले, जावई सुधीर थोरात यांनी भगवान बुचडे याचा धारदार शस्त्राने जागीच भोकसून खून केला. या हल्ल्यात महेश बुचडे, नाना बुचड हे दोघेही जखमी झाले.