शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

उमंग अ‍ॅपद्वारे सफाई कर्मचाऱ्याला एक लाखाचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 9:43 PM

मामाच्या खात्यात वळते करणाऱ्या मोबाईल रिचार्ज दुकानातील कर्मचाऱ्यास भाईंदर पोलीसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देतातडीने हालचाली करुन रामरतन व निरज मंडल यांना अटक केली.बंद झाल्याने त्या दुकानातील रामरतन खुशीलाल मंडल (२३) याने पाटील यांना आधार क्रमांक लिंक करावा लागेल असे सांगून आधार ओळखपत्र मिळवले.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील एका कंत्राटी कामगाराच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन त्याच्या खात्यातील भविष्य निर्वाह निधीचे १ लाख ८ हजार रुपये आधार लिंक जोडुन उमंग अ‍ॅपद्वारे परस्पर आपल्या मामाच्या खात्यात वळते करणाऱ्या मोबाईल रिचार्ज दुकानातील कर्मचाऱ्यास भाईंदर पोलीसांनी अटक केली आहे.कंत्राटी सफाई कामगार रवींद्र पाटील हे मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी एका दुकानात जात असत. नंबर बंद झाल्याने त्या दुकानातील रामरतन खुशीलाल मंडल (२३) याने पाटील यांना आधार क्रमांक लिंक करावा लागेल असे सांगून आधार ओळखपत्र मिळवले. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करुन येतो सांगून आधारकार्डचा उमंग अ‍ॅपद्वारे वापर करुन पाटील यांच्या खात्यातील १ लाख ८ हजाराची रक्कम नालतग निरज मंडल याच्या खात्यात वळती केली. पाटील यांनी पैसे कुठे गेले याची माहिती घेतली असता ते काते मंडलचे असल्याचे समजल्यावर त्याने रामरतन यास पोलीसात तक्रार करण्याचे सांगीतले. त्यावर पैसे देतो सांगुन देखील रामरतन ते देत नव्हता. अखेर श्रमजीवी कामगार संघटनेकडे पाटील यांनी फिर्याद केल्यावर पदाधिकाऱ्यांनी भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. पोलीसांनी पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करुन घेत तातडीने हालचाली करुन रामरतन व निरज मंडल यांना अटक केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडArrestअटक