Nude photos of the girl were uploaded on Facebook by opened fake account | फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून तरुणीचे नग्न फोटो केले अपलोड
फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून तरुणीचे नग्न फोटो केले अपलोड

चाकण : फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एका २१ वर्षीय तरुणीचे नग्न फोटो अपलोड केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०१८ ते दि. ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चाकण येथील धाडगे आळीत घडला. सुनील बांबू ( पूर्ण नाव, पत्ता नाही ) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी याने फेसबुकवर फेक अकाउंट बनवून या अकाउंटवर पीडित तरुणीचा प्रोफाइल फोटो लावला. तसेच अकाउंटचा कव्हर फोटो अर्धनग्न लावून पीडित तरुणीचे त्याच्याकडे असलेले विवस्त्र फोटो या फेसबुक अकाउंटवर टाकून बदनामी केली. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार हे पुढील तपास करीत आहेत. 
 

Web Title: Nude photos of the girl were uploaded on Facebook by opened fake account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.