एनआयएचे तामिळनाडूत ६ ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईलसह कागदपत्र जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 07:07 PM2019-10-31T19:07:39+5:302019-10-31T19:11:06+5:30

हिंदू कार्यकर्ते कोईम्बतूर येथे टार्गेटवर होते.

NIA is carrying out searches at 6 locations in Tamil Nadu in connection with 2018 ISIS Coimbatore case. | एनआयएचे तामिळनाडूत ६ ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईलसह कागदपत्र जप्त  

एनआयएचे तामिळनाडूत ६ ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईलसह कागदपत्र जप्त  

googlenewsNext
ठळक मुद्देएक छापा नागापट्टीनम येथील तिरुचिरापल्लीतील सिवगंगादुसरा छापा टूथुकुडी जिल्ह्यात टाकण्यात आला होता. छाप्यादरम्यान एनआयएने २ लॅपटॉप, ८ मोबाईल्स, ५ सिमकार्ड, १ एसडी कार्ड आणि १४ कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

तामिळनाडू - २०१८ च्या इसिस कोईम्बतूर प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूत ६ ठिकाणी छापेमारी केली. आरोपपत्र दाखल केलेले सहा आरोपी आणि त्यांच्या साथीदारांच्या हिंदू कार्यकर्ते कोईम्बतूर येथे टार्गेटवर होते. या आरोपींच्या साथीदारांच्या कोईम्बतूर शहरात राहत्या घरी दोन ठिकाणी एनआयएने छापे टाकले. एक छापा नागापट्टीनम येथील तिरुचिरापल्लीतील सिवगंगा तर दुसरा छापा टूथुकुडी जिल्ह्यात टाकण्यात आला होता. 

छाप्यादरम्यान एनआयएने २ लॅपटॉप, ८ मोबाईल्स, ५ सिमकार्ड, १ एसडी कार्ड आणि १४ कागदपत्रे हस्तगत केली आहेत. श्रीलंकेत ‘इस्टर डे’ च्या दिवशी घडलेल्या बॅाम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी सकाळपासून छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.

Web Title: NIA is carrying out searches at 6 locations in Tamil Nadu in connection with 2018 ISIS Coimbatore case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.