मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

By पूनम अपराज | Updated: September 21, 2020 13:52 IST2020-09-21T13:50:09+5:302020-09-21T13:52:40+5:30

संतप्त पुतण्यांनी काकाला बेदम मारहाण केली, बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असताना काकांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.

Nephews beat his uncle to death for not feeding the fish; Beaten to death | मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

ठळक मुद्देतुषार कांत उर्फ सोनू (वय 30) हा सिकरौल येथे राहणार असून हा चार भावांपैकी धाकटा होता. १८ सप्टेंबर रोजी मासे घेऊन तो घरी आला आणि गच्चीवर जेवण बनवून आपला मोठा भाऊ वरुण याच्याबरोबर जेवू लागला.मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यासंदर्भात इन्स्पेक्टर कैंट यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

काकाने घरी मासे घेऊन येणे आणि पुतण्यांना ते खायला न देणं खूपच महागात पडलं. संतप्त पुतण्यांनी काकाला बेदम मारहाण केली, बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असताना काकाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या प्रकरणात संशयास्पद लोकांची चौकशी करत आहेत.


तुषार कांत उर्फ सोनू (वय 30) हा सिकरौल येथे राहणार होता असून हा चार भावांपैकी धाकटा होता. १८ सप्टेंबर रोजी मासे घेऊन तो घरी आला आणि गच्चीवर जेवण बनवून आपला मोठा भाऊ वरुण याच्याबरोबर जेवू लागला. यावेळी त्याने दोन पुतण्यांनी मासे खाण्यास सांगितले नाही. त्यामुळे संतप्त पुतण्यांनी काकांला स्टंप व बॅटने मारहाण करून जखमी केले होते.

तुषारच्या भावाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमीस कबीरचौरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने तुषारला बीएचयू ट्रॉम सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यासंदर्भात इन्स्पेक्टर कैंट यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

Web Title: Nephews beat his uncle to death for not feeding the fish; Beaten to death