"शेजाऱ्यांनी कटकारस्थान करून माझ्या कोंबड्याचा पाय मोडला,’’ मालकिणीची पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:40 PM2021-06-10T16:40:06+5:302021-06-10T16:40:32+5:30

Crime News: एका महिलेने शेजाऱ्यांनी तिच्या कोंबड्याचा पाय कटकारस्थान करून मोडल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे.

"Neighbors conspired and broke my Cock's leg," the owner of Cock complained to the police | "शेजाऱ्यांनी कटकारस्थान करून माझ्या कोंबड्याचा पाय मोडला,’’ मालकिणीची पोलिसांत तक्रार 

"शेजाऱ्यांनी कटकारस्थान करून माझ्या कोंबड्याचा पाय मोडला,’’ मालकिणीची पोलिसांत तक्रार 

Next

रांची - झारखंडमधील गढवा येथे एक अजब प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने शेजाऱ्यांनी तिच्या कोंबड्याचा पाय कटकारस्थान करून मोडल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. (Crime News) गढवा सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाला गावामध्ये एक कोंबडा शेजाऱ्या-शेजाऱ्यांमधील वादाचे कारण ठरला आहे. प्रतिमा नावाच्या महिलेच्या मुलाने काठी मारून आपल्या कोंबड्याचा पाय मोडल्याची तक्रार शेजारील महिलेने पोलिसांत दिली आहे. ("Neighbors conspired and broke my Cock's leg," the owner of Cock complained to the police)

या कोंबड्याच्या मालकिणीने शेजारी राहणाऱ्या महिलेवर तिच्या कोंबड्याचा पाय मोडल्याचा आरोप केला. त्यानंतर दोघांमधील बाचाबाची वाढत गेली आणि हाणामारी सुरू झाली. काही वेळाने या कोंबड्याची मालकीण असलेली महिला कोंबड्याला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे तिने कोंबड्याच्या मोडलेल्या पायाची तक्रार पोलिसांकडे केली. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मुलाने काठी मारून कोंबड्याचा पाय मोडल्याचा आरोप तिने केला. 

कोंबड्याच्या मालकिणीने पोलिसांत तक्रार दिली की, तिचा कोंबडा हा पाळीव आहे. तसेच त्याला झालेल्या दुखापतीच्या उपचारांवर खर्च होणार आहे. त्याची भरपाई कोण करणार. दरम्यान, शेजारील महिलेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्या कोंबड्याचा पाय आम्ही मोडलेला नाही, तर त्या महिलेने माझ्या मुलाला मारहाण केली असा प्रत्यारोप तिने केला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी आता या अजब प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता दोघांच्याही तक्रारीवर लक्ष दिले जात आहे. तसेच ज्याची चूक असेल त्याच्यावर पोलीस कारवाई करणात आहेत. सध्यातरी पोलीस ठाण्यात या प्रकरणावरून तक्रार दिल्यानंतर दोन्ही महिला घरी गेल्या आहेत. 

English summary :
"Neighbors conspired and broke my Cock's leg," the owner of Cock complained to the police

Web Title: "Neighbors conspired and broke my Cock's leg," the owner of Cock complained to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app