NCB official big revelation; Arjun Rampal was supplying drugs to Shahrukh Khan | NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

ठळक मुद्देअर्जुन रामपाल हा शाहरुख खानला ड्रग्स पुरवठा करत असेआतापर्यंत या प्रकरणात फक्त अभिनेत्रींची नावे पुढे येत होती, मात्र पहिल्यांदा अभिनेत्यांची नावे समोर येत आहेतदुबईत बसलेल्या काही लोकांच्या मदतीने काही बॉलिवूडमधील लोकं आपलं अस्तित्व बनवायचे - उज्ज्वल निकम

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्स यांच्यातील कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये आतापर्यंत एनसीबीने दिपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यासारख्या बड्या अभिनेत्रींची चौकशी केली आहे. मात्र आता या प्रकरणात बॉलिवूडमधील ४ मोठ्या सेलेब्रिंटींची नावे समोर येत आहेत. यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांचा सहभाग आहे.

यात मोठा खुलासा म्हणजे अर्जुन रामपाल हा शाहरुख खानला ड्रग्स पुरवठा करत असे, आतापर्यंत या प्रकरणात फक्त अभिनेत्रींची नावे पुढे येत होती, मात्र पहिल्यांदा अभिनेत्यांची नावे समोर येत आहेत. एका एनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींच्या नावाचा खुलासा केला आहे. यासंदर्भात दैनिक भास्करने बातमी दिली आहे. एनसीबी अधिकाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या बातमीत म्हटलंय की, गेल्या दोन दिवसांपासून माध्यमात नाव नाही परंतु A, D, R आणि S या कोडने संकेत दिले जात होते. आता A चा अर्थ अर्जुन रामपाल, D चा अर्थ डिनो मोरिया, R चा अर्थ रणबीर कपूर आणि S चा अर्थ शाहरुख खान हे स्पष्ट झालं आहे. ड्रग्स पेडलर्सच्या सोर्सने सांगितलं की, अर्जुन रामपाल शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करत होता. पण डिनो मोरिया कोणाला ड्रग्स सप्लाय करायचा? हे अद्याप तपासात समोर आलं नाही, पण चौकशी सुरु आहे.

शाहरुख खान सध्या दुबईत

शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून आयपीएलचा आनंद घेत आहे. त्याचवेळी अर्जुन रामपाल मुंबईत त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त आहे. रणबीर कपूर मागच्या आठवड्यात कुटुंबासोबत बर्थडे साजरा करताना दिसला होता. तर डिनो मोरिया देखील सध्या मुंबईत आहे.

काय म्हणाले होते ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम?

एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. हे हसीस, गांजा आणि या सर्व गोष्टींसंबंधित चर्चा कोठून आली आहे, असं उज्जल निकम सांगतात. बॉलिवूड गँगवर बोलताना ते म्हणाले की, दुबईत बसलेल्या काही लोकांच्या मदतीने काही बॉलिवूडमधील लोकं आपलं अस्तित्व बनवायचे .त्यानंतर बॉलिवूडमधील लोक विचार करू लागले की, कोणीही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात जवळपास २० जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बरीच मोठी नावेही समोर आली आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर अशी नावे आहेत. एनसीबीने या सर्व लोकांना बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबी चौकशीत रियाने सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे घेतली होती.

Read in English

Web Title: NCB official big revelation; Arjun Rampal was supplying drugs to Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.