शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 06:44 IST

ही टोळी एकामागे पाच ते दहा लाख रुपये उकळत होती. ब्रह्म ज्योती याच्या टोळीने मुंबई आणि चेन्नई येथून आठजणांना टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला पाठविले.

मुंबई - ते दोघेही वर्गमित्र. शिक्षणामुळे नौदलात दाखल झाले. एक लेफ्टनंट, दुसरा सब लेफ्टनंट. पैशांच्या मोहाने मात्र त्यांनी मानवी तस्करीची वाट धरली, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. या टोळीचे थेट पाकिस्तान कनेक्शनही समोर येत असल्याने गुन्हे शाखेने दोघांची चौकशी सुरू केली आहे.

गुन्हे शाखेने सब-लेफ्टनंट असलेला ब्रह्म ज्योती, त्याचा वर्गमित्र लेफ्टनंट विपीनकुमार डागर आणि सिमरन तेजी यांच्यासह रविकुमार आणि दीपक डोगरा यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी भारतातून नागरिकांना अवैधरित्या द. कोरियात पाठवत होती, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी व्हिसा घेऊन दक्षिण कोरियामध्ये जात आहेत. यातील बहुसंख्य हे दक्षिण कोरियातील सुंदरी भागात वास्तव्यास आहेत. येथे भारतातून गेलेल्यांची भेट पाकिस्तान आणि बांगलादेशमधून जाणाऱ्यांशी होत असल्याने या प्रकरणात दहशतवादाचे काही कनेक्शन आहे का, याचाही तपास करणार आहे.

ही टोळी एकामागे पाच ते दहा लाख रुपये उकळत होती. ब्रह्म ज्योती याच्या टोळीने मुंबई आणि चेन्नई येथून आठजणांना टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला पाठविले. मात्र, यातील दोघांना दक्षिण कोरियाने माघारी धाडले. ते जम्मू-काश्मीरचे रहिवासी असून, सीआययूचे पथक या दोघांचा जबाब नोंदविणार आहे, तर १२ जणांच्या कागदपत्रांचा संशय आल्याने कोरियन दूतावासाने त्यांना टुरिस्ट व्हिसा नाकारल्याचे तपासात समोर आले. सीआययूने डागरकडून १४ पासपोर्ट जप्त केले. त्याच्या बँक खात्यातून ४० लाखांहून अधिकची रक्कम व सिमरन तेजीच्या खात्यातही मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे.

दातांचा डॉक्टर अन् भांडाफोडनववी पास असलेला रविकुमार हा कारपेंटर आहे. त्याला दातांचा डॉक्टर बनवून दक्षिण कोरियाला पाठविण्याचा प्रयत्न सुरू होता. तो मूळचा जम्मूचा असून, नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचे दाखवले होते. रविकुमारला दूतावासाकडून परवानगी नाकारली होती. मात्र, तो आपला भाऊ असल्याचे सांगून डागरने दूतावासातील अधिकाऱ्यांशी वाद घातला. यातूनच या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याचे समजते.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीindian navyभारतीय नौदल