पत्नीने लग्नानंतर तीन महिन्यातच पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी आणि तिचचे कुटुंबीय मोबाईल बंद करून फरार झाले आहे. मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हापुड जिल्ह्यातील बहादूरगड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मोहम्मदपूर रुस्तमपूर गावात ही घठना घडली. ३२ वर्षीय आरिश अली याचे लग्न २५ एप्रिल २०२५ रोजी बिजनोर जिल्ह्यातील स्योहार गावातील रहिमासोबत झाले होते.
माझा एकुलता एक मुलगा होता
आरिशच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, माझा एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्न रहिमासोबत झाले होते. पण, रहिमा या लग्नामुळे आनंदी नव्हती. ती सारखी आरिफसोबत भांडणं करायची. नातेवाईकांनी, गावातील लोकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. संपत्तीतून हिस्सा दे म्हणायची.
त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता
आरिशची आई म्हणाली, सात ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.५० वाजेच्या सुमारास आरिशच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर मी माज्या मुलीसोबत आरिशच्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी आरडाओरड करू लागलो. आम्ही शेजाऱ्यांनाही बोलावलं.
बऱ्याच वेळानंतर रहिमाने खोलीचा दरवाजा उघडला. आम्ही खोलीत बघितले तेव्हा आरिशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आणि पिस्तुल टेबलवर ठेवलेलं होतं. त्यानंतर आम्ही त्याला मेरठला घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी लवकर गुन्हाच दाखल केला नाही
आरिशच्या आईने स्थानिक पोलिसांवर आरोप केला आहे. आम्ही तीन वेळा तक्रार दिली, पण हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही. आम्ही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर पोलीस मनोज बालियान यांनी सूनेची चौकशी केली आणि तिला सोडून दिले. तेव्हापासून ती फरार आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल केला गेला असून, सूनेची चौकशी करण्यात आली आहे. तथ्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला जात आहे.