स्वच्छतागृहात पडलेल्या त्या तरुणाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:50 PM2018-09-29T17:50:35+5:302018-09-29T17:53:55+5:30

मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुळचा मध्यप्रदेशातील एका तरुणाचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून आला होता.

murdred case of student who saw fall down in the toilet | स्वच्छतागृहात पडलेल्या त्या तरुणाचा खून 

स्वच्छतागृहात पडलेल्या त्या तरुणाचा खून 

Next
ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल इंजिनिअरींगचे खासगी क्लास करण्यासाठी पुण्यात

पुणे : एरंडवणा येथे मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका तरुणाचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून आला होता. ही घटना मार्च महिन्यात घडली होती. त्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तो तरुण मध्यप्रदेशातून केवळ  इजिनियरींगचे खासगी क्लास करण्यासाठी पुण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  
सौरभ सतिश गोन्डाने (वय २८, सध्या. डेक्कन जिमखाना, मुळ गाव मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सहायक निरीक्षक सुयश जोशी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा मुळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. तो जानेवारी २०१८ मध्ये इंजिनिअरींगचे खासगी क्लास करण्यासाठी आला होता. सांगली येथील ५ तरुण व तो ऐरंडवणा येथील उदयहौसिंग सोसायटीत येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान मार्च महिन्यात (३ मार्च २०१८) सकाळी ६ वाजता सौरभ स्वच्छता गृहात पडल्याचे मित्रांना दिसले. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, सौरभ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. 

Web Title: murdred case of student who saw fall down in the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.