धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:47 IST2021-03-02T12:45:05+5:302021-03-02T12:47:15+5:30

Murder of a youth कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले.

Murder of a youth over a dispute over parking of a vehicle | धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

ठळक मुद्देविठ्ठल अशोक पाणभरे असे मृतकाचे नाव आहे.कुलदीप कोंडू गाडवे असे आरोपीचे नाव आहे.

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वाहन पार्किंग करण्याच्या वादातून २२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. विठ्ठल अशोक पाणभरे असे मृतकाचे नाव असून, कुलदीप कोंडू गाडवे (२७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून, मंगरूळपीर पोलीस हे आरोपीचा शोध घेत आहेत.
मंगरूळपीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शेलुबाजार गाव ओळखले जाते. येथील प्रमुख चौकात वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. वाहन पार्किंग करण्यावरून कधी-कधी वाद उद्भवतात. दुचाकी व कार पार्किंग करण्यावरून आरोपी कुलदीप गाडवे आणि मृतक विठ्ठल पाणभरे यांच्यातही १ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वाद उद्भवला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले असून, कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले. यामध्ये विठ्ठल पाणभरे याचा मृत्यू झाला असून, मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी कुलदीप गाडवे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी हा फरार असून, मंगरूळपीर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव करीत आहेत.

Web Title: Murder of a youth over a dispute over parking of a vehicle