चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:35 PM2019-09-03T15:35:25+5:302019-09-03T15:36:10+5:30

माध्यमिक शाळेतील अल्पवयीन मुलीचा चारित्र्याच्या संशयावरुन निर्घृण खून करण्यात आला आहे.

The murder of a minor girl on suspicion character | चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून 

चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून 

Next

इंदापूर : निमसाखर येथे माध्यमिक शाळेतील अल्पवयीन मुलीचा चारित्र्याच्या संशयावरुन सोमवारी रात्री निरा नदीकाठी सामाजिक वनीकरणात निर्घृण खून करण्यात आला आहे. अश्विनी पोटफोडे असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मालन पोटफोडे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश खरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमसाखर (ता. इंदापुर) येथील आरोपी गणेश याने मालन पोटफोडे व त्यांची मुलगी अश्विनी पोटफोडे (वय १५)यांना मोटारसायकलवर बसवुन निरा नदीकाठी जवळील सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात नेवुन अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करुन तिचा खुन केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत

Web Title: The murder of a minor girl on suspicion character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.