वारणा कापशी येथील अपहरण झालेल्या बालकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:16 AM2021-10-05T11:16:20+5:302021-10-05T11:17:12+5:30

नरबळीतून प्रकार घडल्याचा संशय 

Murder of kidnapped child at Warna Kapashi police investigating more | वारणा कापशी येथील अपहरण झालेल्या बालकाचा खून 

वारणा कापशी येथील अपहरण झालेल्या बालकाचा खून 

googlenewsNext
ठळक मुद्देनरबळीतून प्रकार घडल्याचा संशय 

अनिल पाटील

सरुड : वारणा कापशी ( ता . शाहूवाडी ) येथील अपहरण झालेल्या आरव राकेश केसरे या सात वर्षाच्या बालकाची हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाले. आरवचा मृतदेह मंगळवारी पहाटे  त्याच्या राहत्या घरासमोर आढळून आला. दरम्यान आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल टाकलेला असल्याने नरबळीच्या प्रकारातून आरवचा घातपात झाल्याचा संशय गावात व्यक्त होत आहे. पोलिसांकडून त्यास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी , रविवारी सायंकाळी आरव हा घराच्या दारात खेळत असताना अज्ञाताने त्याचे अपहरण केले होते. त्यावेळी पासुन पोलिसांसह ग्रामस्थ आरवचा शोध घेत होते. मंगळवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या समोर आढळून आला .आरवचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले असून मृत आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल टाकल्याचे तसेच पाठीवर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

त्यामुळे आरवचा खुन  हा नरबळीचा प्रकारातुन झाला असल्याचा संशय  व्यक्त होत आहे . या घटनेने ग्रामस्थाच्यांतुन तीव्र संताप व्यक्त होत असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे .दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी गावास भेट दिली आहे.

Web Title: Murder of kidnapped child at Warna Kapashi police investigating more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.