शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 2:50 AM

अविवाहित दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

बुलडाणा: खेर्डा येथील अविवाहित दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक नमुने घेणाऱ्या पथकाने आनुषंगिक नमुने घेतले असून, श्वानाने थेट आरोपीचे घर गाठल्याने अत्याचार करणाºयास दुपारी २ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली.

रितेश गजानन देशमुख (३०)असे आरोपीचे नाव असून, पीडित महिलेच्या घराजवळच तो राहत होता. दिव्यांग महिला चुलत भावाच्या घरालगत राहत होती. या घराचे बांधकाम सुरू असून, दरवाजेही लावलेले नाहीत. शुक्रवारी त्याने मद्य प्राशन करून गावात आणि घरी गोंधळ घातला.

मध्यरात्री तो पीडित महिलेच्या घरात शिरला व त्याने लैंगिक अत्याचार केला. त्यास पीडितेने प्रतिकार केला असता तेथे असलेल्या काठीने दिव्यांग महिलेस मारहाण केली. त्यातच गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या कृत्याबाबत आरोपीने त्याच्या पत्नीकडे लैंगिक अत्याचार व खून केल्याची कबुली दिली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. अद्याप मृत महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसला तरी सकृतदर्शनी लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या झाल्याच्या बाबीस त्यांनी पुष्टी दिली.

ज्युलीमुळे आरोपीचा छडा

दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान डॉग स्कॉडमधील ज्युली नावाची कुत्री, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक सायन्स पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानास घटनास्थळी पडलेल्या राफ्टरचा वास दिल्यानंतर श्वानाने थेट तीन घरे सोडून असलेल्या रितेशच्या घराचा रस्ता दाखविला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. रितेशने वापरलेले कपडेही रात्रीच धुतले होते. श्वानाने थेट त्याचे घर गाठत त्याचे हे कपडेही शोधल्याचे स्थानिकांनी सांगितले.लैंगिक अत्याचार करून दिव्यांग अविवाहित महिलेचा आरोपीने खून केल्याचे तपासात समोर येत आहे. आरोपीने त्याच्या पत्नीजवळही या कृत्याची कबुली सकाळी दिल्याचेही समोर येत असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर बºयाच बाबी स्पष्ट होतील.-डॉ. दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक, बुलडाणा

डांबून ठेवलेल्या बालिकेवर अत्याचार

जालना : फूस लावून पळवून नेलेल्या १३ वर्षीय मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जालना तालुक्यातील सुंदरनगर येथून २३ दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीची चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी सेनगाव (जि.हिंगोली) शिवारातील शेतवस्तीतून सुटका केली. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.च्पथकाने सेनगाव येथील शेतवस्तीवर धाड मारुन मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली व दत्ता धनगरला जेरबंद केले. पळवून नेल्यानंतर दोन- तीन दिवसांत लग्न लावण्याची तयारी आरोपींनी सुरू केली होती, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारbuldhanaबुलडाणाPoliceपोलिसArrestअटक